

यशवंत सहकारी बँकेस ३ कोटी ९७ लाख ढोबळ नफा
कुडित्रे : यशवंत सहकारी बँकेस २०२५-२६ आर्थिक वर्षात ३ कोटी ९७ लाख ढोबळ नफा व तरतुदी करून १ कोटी ८२ लाख निव्वळ नफा प्राप्त झाल्याचे महेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. एकूण व्यवसायात ४५ कोटी ४४ लाखांची वाढ होऊन तो ३४८ कोटी २० लाख झाला. ठेवीमध्ये २९ कोटी ४१ लाखांची वाढ होऊन २०९ कोटी ४७ लाख झाल्या आहेत. कर्जात १६ कोटी ३ लाखांची वाढ होऊन १३८ कोटी ७३ लाख झाली. बँकेने २०० कोटी ठेवींचा टप्पा पार केला. चालू आर्थिक वर्षात ४०० कोटींच्या व्यवसायाचे उद्दिष्ट आहे. बँकेने डेटा सेंटर व डीआरसाईट ही क्लाऊड या अत्याधुनिक प्रणालीवर स्थलांतरित केली आहे. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष दिलीप खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पाटील व संचालक प्रकाश देसाई, अमर पाटील, भगवंत पाटील, नंदकुमार पाटील, विश्वास पाटील, सर्जेराव शेलार, हिंदुराव तोडकर, कुंडलिक पाटील, प्रल्हाद खाडे, दतात्रय पाटील, मधुकर पाटील, कुलभूषण पाटील, चंद्रकांत पाटील, जयसिंग सूर्यवंशी, महेश पाटील, बाबूराव रानगे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.