माझे गाव, आरोग्य संपन्न गाव'' उपक्रमासाठी करवीरमध्ये कार्यशाळा

माझे गाव, आरोग्य संपन्न गाव'' उपक्रमासाठी करवीरमध्ये कार्यशाळा
Published on

‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’
उपक्रमासाठी करवीरमध्ये कार्यशाळा

​कुडित्रे : करवीर पंचायत समितीअंतर्गत ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात मार्गदर्शक कार्यशाळा झाली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने यांनी यावेळी मार्गदर्शन करताना गाव पातळीवर प्रत्येक कुटुंबापर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहोचवण्याचे आवाहन केले. ​वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक, आरोग्यसेवक, सेविका आणि आशा स्वयंसेविकांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या. प्रामुख्याने माताबाल संगोपन, गर्भवतींची नोंदणी, संस्थात्मक प्रसूती आणि बालकांचे १०० टक्के लसीकरण यावर विशेष भर दिला. क्षयरोग, कुष्ठरोग, डेंगी व मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी सर्वेक्षणाच्या सूचना डॉ. मदने यांनी दिल्या. ​ग्रामीण भागात मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारखे असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी स्क्रिनिंग वाढवण्याचे निर्देश दिले. डिजिटल क्रांतीचा भाग म्हणून ‘ई-सुश्रुत’ प्रणालीवर नोंदी अद्ययावत ठेवणे आणि टेलिमेडिसिन सेवांचा लाभ रुग्णांना देण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. जागृतीसाठी आरोग्य मेळावे, पथनाट्य आणि ग्रामसभांचे आयोजन करण्याचे निश्चित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com