कागल : जलजीवन च्या आराखड्यास मंजुरी. - समरजितसिंह घाटगे

कागल : जलजीवन च्या आराखड्यास मंजुरी. - समरजितसिंह घाटगे

Published on

कागलमधील १४ योजनांचा
''जलजीवन'' मध्ये समावेश

भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची माहिती

कागल, ता. १८ : केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पुरवणी आराखड्यास नुकतीच मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने कागल विधानसभा मतदारसंघातील एकूण १४ योजनांचा समावेश असून २० कोटींच्या पुरवणी आराखड्यास मंजुरी मिळाली असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या कामी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे घाटगे यांनी म्हटले आहे.
कागल तालुक्यातील पुढील गावांसाठी मंजूर झालेला निधी असाः मळगे खुर्द १ कोटी ३० लाख, खडकेवाडा १ कोटी ६७ लाख, निढोरी १ कोटी ५४ लाख, बामणी २ कोटी २ लाख, कुरणी ६० लाख, बोळावी ८३ लाख, भडगाव १ कोटी ८३ लाख, बाचणी ४ कोटी ७० लाख, चिमगाव १ कोटी ९ लाख, बेलवळे बु. १ कोटी ९० लाख, यमगे ६० लाख, सावर्डे बु. ८६ लाख. भादवण (ता. आजरा) १ कोटी ५४ लाख.

पत्रकात म्हटले आहे, ग्रामीण भागातील नागरिकांना नळाद्वारे स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी ''जलजीवन मिशन'' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र शासनाने हाती घेतलेला आहे. यामध्ये प्रत्येक मनुष्यास ५० लिटरप्रमाणे गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने सविस्तर आराखडे तयार करण्याच्या सूचना केंद्राने दिलेल्या आहेत. जलजीवन योजनेमध्ये कागल विधानसभा मतदारसंघाला निधी मिळाल्यामुळे तालुक्यातील काही गावांमध्ये नवीन योजना तर काही गावांतील पाणी योजनांची क्षमताही वाढणार आहे. तर काही योजनांची दुरुस्तीही करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात कागल विधानसभा मतदारसंघात ऐन उन्हाळ्यात नागरिकांना भेडसावणारी पाणीटंचाई निकालात निघणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.