कागल : आई वडिलांचा लग्नाचा वाढदिवसानिमित्त ८६ वृक्षरोपे भेट

कागल : आई वडिलांचा लग्नाचा वाढदिवसानिमित्त ८६ वृक्षरोपे भेट

Published on

05302
कागल : शिवाजी विद्यापीठास वृक्षारोपणासाठी रोपे भेट देताना विनायक उपाध्ये, अक्षय भोसले, दिपक माने, अजित इंगळे आदी.

शिवाजी विद्यापीठास ८६ रोपे भेट
कागल : वाढदिवस म्हटले की मोठा डामडौल आणि गाजावाजा करुन पैशाची उधळपट्टीची प्रथा रुढ होते आहे, पण येथील एका वृक्षमित्राने आपल्या आई वडिलांचा ४३ वा लग्नाचा वाढदिवस ८६ रोपे शिवाजी विद्यापीठात वृक्षारोपणासाठी भेट देऊन साजरा केला. विनायक उपाध्ये असे त्या वृक्षमित्राचे नाव आहे. वडील प्रकाश उपाध्ये व आई उज्वला यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त निसर्ग संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम राबवून त्यांनी एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे. उपकुलसचिव डॉ. व्ही. एन, शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसीर कडूनिंब, अर्जून, चिंच, मोर आवळा, सीता अशोक, ताम्हण, शिवण, वड, नांद्रुक, म्हाळुंग या वृक्षांची रोपे भेट देण्यात आली. या वेळी अक्षय भोसले, दिपक माने, अजित इंगळे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.