कागल : शाहू सलग दुसऱ्या वर्षीही बेस्ट को-जनरेशन पॉवर प्लॅन्ट पुरस्काराचा मानकरी.
बेस्ट को-जनरेशन पॉवर प्लॅन्ट
पुरस्काराचा शाहू कारखाना मानकरी
कागल, ता. ७ : श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास २०२२- २३ चा देश पातळीवरील को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या नामांकित संस्थेचा बेस्ट को-जनरेशन पॉवर प्लॅन्टसाठीचा देश पातळीवरील पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी जाहीर झाला. पुरस्काराची निवड को-ऑप. सेक्टरमध्ये ८७ किलो परसेंटिमीटर स्क्वेअर बाॕयलर प्रेशरपेक्षा कमी बाॕयलर प्रेशर’ विभागात झाली. २०२१ -२२ मध्ये संस्थेने कारखान्यास बेस्ट को-जनरेशन पॉवर प्लॅन्ट पुरस्काराने सन्मानित केले होते. कारखान्यास मिळालेला हा ६८ वा पुरस्कार आहे. राष्ट्रीय पातळीवरील २५ तर राज्य पातळीवरील ४३ पुरस्कारांचा समावेश आहे.
को - जन असोसिएशनचे डायरेक्टर जनरल संजय खताळ यांनी पुरस्कार निवडीचे पत्र कारखान्यास पाठविले आहे. १६ सप्टेंबरला पुणे येथे को-जन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री व विद्यमान राज्यसभा खासदार शरद पवार यांच्याहस्ते दिमाखदार सोहळ्यात पुरस्काराचे वितरण होईल. याबाबत शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘सभासद, शेतकऱ्यांचाच हा सन्मान असून, छत्रपती शाहू महाराज यांचे आशीर्वाद व संस्थापक स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे समोर ठेवूनच कारखाना व्यवस्थापन आणि प्रशासन कार्यरत असल्याने पुरस्कारातील सातत्य टिकून आहे.
चौकट
सभासद, शेतकऱ्यांनी विश्वासाने व प्रामाणिकपणाने दिलेली साथ आणि व्यवस्थापनाचे नियोजनास अधिकारी- कर्मचारी यांच्या कष्टाची जोड याचा परिपाक आहे. पुरस्काराचे खरे मानकरी सभासद शेतकरी आहेत. कारखान्याचे संस्थापक स्व. राजेसाहेब यांच्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्ताने मिळालेल्या ६८ व्या पुरस्कारामुळे स्व.राजेसाहेबांना कृतीतूनच अभिवादन आहे.
- सुहासिनीदेवी घाटगे, अध्यक्षा, शाहू साखर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.