कागल : निराधार योजना लाभार्थ्यांचे सप्टेंबर २०२३ अखेर अनुदान जमा

कागल : निराधार योजना लाभार्थ्यांचे सप्टेंबर २०२३ अखेर अनुदान जमा

Published on

कागलला निराधार लाभार्थ्यांचे अनुदान जमा
कागल : संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील सर्व लाभार्थ्यांचे माहे सप्टेंबर २०२३ अखेर एकूण ४ कोटी ९० लाख रूपये अनुदान जमा झाल्याची माहिती प्रताप उर्फ भैय्या माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील बऱ्याच लाभार्थ्याचे अनुदान प्रलंबित होते. दीपावली जवळ आल्यामुळे लाभार्थ्याना अनुदान मिळणे गरजेचे होते. त्यानुसार अनुदान लाभार्थ्यांना दीपावलीआधी मिळण्याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले होते. त्यानुसार संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील सर्व लाभार्थ्यांचे माहे सप्टेंबर २०२३ अखेर एकूण ४ कोटी ९० लाख रूपये अनुदान उपलब्ध झाले. त्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांचे माजी संजय गांधी निराधार योजना समितीच्यावतीने आभार मानण्यात आले. लाभार्थ्यांना दोनच दिवसांत बँकेतून वितरित होईल. संबंधित लाभार्थ्यांनी अनुदान वेळेवर उचल करावे; असे आवाहन श्री. माने यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.