कागल : समरजितसिंह घाटगे - गत दोन वर्षात१०७४जणांना पेन्शन मंजुरी

कागल : समरजितसिंह घाटगे - गत दोन वर्षात१०७४जणांना पेन्शन मंजुरी

06378
कागल : येथे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांच्या वाटपानंतर लाभार्थ्यांसमवेत शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे.
.....
दोन वर्षात १०७४ जणांना पेन्शन मंजुरी

समरजितसिंह ः लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. १० : ‘कागल विधानसभा मतदारसंघात याआधी संजय गांधी, श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना गट बघून लाभ दिला जात होता. मात्र, आमच्या कार्यकर्त्यांनी गट-तट न पाहता या योजनेपासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना विनासायास लाभ मिळवून देऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिप्रेत समाजकार्य केले आहे. गेल्या दोन वर्षात एक हजार ७४ लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर केली,’ असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी केले.
घाटगे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कागल तालुक्यातील संजय गांधी श्रावणबाळ इंदिरा गांधी पेन्शन व अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्राच्या वाटपवेळी ते बोलत होते. यावेळी लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते मंजुरी पत्राचे वाटप केले.
घाटगे म्हणाले, ‘कागल तालुका वगळता संपूर्ण राज्यात यापूर्वी या लाभार्थ्यांना पेन्शन शासनामार्फत खात्यावर जमा केली जात होती. मात्र कागल तालुक्यातील लाभार्थ्यांना रोखीने वाटप करताना लाभार्थ्यांवर अन्याय होत होता. मात्र आपण ही रोखीने पेन्शन वाटप बंद करून खात्यावर जमा करण्यासाठी शासन पातळीवर यशस्वीपणे प्रयत्न केले. आता राजे बँकेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरपोच पेन्शन दिली जात आहे. यापुढे जाऊन पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर पेन्शन रक्कम जमा करावी यासाठी आपण मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. लवकरच त्याचीही कार्यवाही होईल.’
यावेळी सुलाबाई कुराडे (कागल), मंगल माने (बामणी), ग्रामपंचायत सदस्य प्रदीप खोत (रणदिवेवाडी), विकी मगदूम यांनीही मनोगत व्यक्त केले. संजय गांधी निराधार समिती सदस्य अरुण गुरव यांनी स्वागत केले. हिदायत नायकवडी आभार यांनी मानले.
यावेळी शाहूचे संचालक बॉबी माने, सतीश पाटील, राजे बँकेचे संचालक राजेंद्र जाधव, जिल्हा सरचिटणीस विवेक कुलकर्णी, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य अमर चौगुले, लखन मकवाने, सुदर्शन मजले, दिलीप पाटील, सागर मोहिते, अमोल शिवई, आदी उपस्थित होते.
............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com