कागल : अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

कागल : अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

आदमापूरला दर्शनासाठी जाताना
अपघातात दुचाकीस्वार ठार
वाघजाई घाटात दुर्घटनाः थांबलेल्या दुचाकीला मागून धडक

कागल,ता. १० : कागल - निढोरी मार्गावर असणाऱ्या वाघजाई घाटात थांबलेल्या दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. गंधर्व वसंत नरळे (वय ३८, रा. आचाकादानी ता. सांगोला, जि. सोलापूर) असे अपघातातील मत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गंधर्व नरळे हे आदमापुर येथे देवदर्शनासाठी जात होते. कागल - निढोरी मार्गावर वाघजाई घाटात ते आले असता रस्त्याकडेला उभी असलेल्या अज्ञात दुचाकीला त्यांच्या दुचाकीची धडक बसली. या धडकेत नरळे यांच्या डोक्याला जबर मार बसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद कागल पोलिस ठाण्यात झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com