कागल : कागल मध्ये आज ३० कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ

कागल : कागल मध्ये आज ३० कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ

कागलमध्ये आज ३० कोटींच्या
विकासकामांचा होणार प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. १० : कागल शहरातील ३० कोटी रुपयांच्या ९६ विकासकामांचा एकत्रित प्रारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते सोमवारी (ता.११) होणार आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर मातंग समाज कागल येथे जाहीर सभा होणार आहे.
या विकासकामांमध्ये विशेष रस्ता अनुदान अंतर्गत शहरांतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण, प्रभाग ४ मधील अंतर्गत रस्ते व गटार करणे, वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून जयसिंगराव घाटगे व्यापारी संकुल इमारतीमध्येत शौचालय बांधणे, रंगरंगोटी व इतर कामे, शिवाजी व्यापारी संकुल इमारतीमध्ये शौचालय बांधणे व अनुषंगिक कामे, प्रभाग क्रमांक १ व प्रभाग क्रमांक १० मधील रस्ते गटारी बांधण्याचे काम, नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत रामरहीम पार्क अंतर्गत खडीकरण व डांबरीकरण, प्रभाग ४ मधील काळम्मावाडी धरणग्रस्त वसाहतीमधील सांस्कृतिक सभागृह बांधकाम व परिसर सुशोभीकरण व अनुषंगिक कामे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून प्रभाग क्रमांक ३ अंतर्गत शाहूनगर बेघर वसाहत येथे व्यायाम शाळा बांधणे, रोहिदास विद्यामंदिर येथील शौचालय बांधकाम व अनुषंगिक कामे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर योजनेतून मुस्लिम कब्रस्तान येथील उर्वरित कंपाउंड वॉल बांधणे, पाझर तलाव येथील स्वागत कमान व गेटचे काम, प्रभाग ११ मध्ये आरसीसी गटार बांधणे, कॅनॉलमध्ये पंपिंग मशिनरी बसवण्याचे काम, लक्ष्मी टेकडी जवळ जलशुद्धीकरण केंद्र व ई टॉयलेटचे काम तसेच दूधगंगा नदी जॅकवेल येथे शंभर अश्वशक्ती क्षमतेची पंपिंग मशिनरी बसविण्याचे कामे.
कार्यक्रमास गोकुळचे संचालक युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, चंद्रकांत गवळी, नवीद मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com