कागलला १५९ भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण

कागलला १५९ भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण

कागलला १५९ भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण

सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. ३० : कागल नगरपरिषदेने शहरातील भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण करण्यास सुरुवात केली आहे. १८ ते २८ एप्रिलअखेर १५९ श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले.
पुण्यातील पेट्स फोर्स अॅनिमल वेल्फेअर कंपनीच्या माध्यमातून शहरातील भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण करण्यास १८ एप्रिलपासून सुरुवात झाली. कंपनीतील कर्मचाऱ्यांनी शहरातील भटक्या श्वानांना पकडण्यास सुरुवात केली आहे. कोष्टी गल्ली, माळी गल्ली, निपाणी वेस, आंबेडकरनगर, शिवाजी चौक, मटण मार्केट, बसस्थानक भुयारी मार्ग, ठाकरे चौक आणि रेल्वे लाईन परिसरात ही मोहिम राबविण्यात आली. ८२ नर व ७७ मादी श्वानांचे निर्बिजीकरण केले. निर्बिजीकरण शस्त्रक्रियेसाठी श्वानांना पालिकेच्या कचरा डेपोत नेले होते. निर्बिजीकरण शस्त्रक्रियेबरोबरच श्वानांना रेबिज प्रतिबंधक लसही देण्यात आली. यातून भटक्या श्वानांच्य्या संख्येवर नियंत्रण राहणार असून, त्यांची आक्रमकता कमी होण्यास मदत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com