कागल : वीज कोसळून चार किरकोळ तर दोघे गंभीर जखमी

कागल : वीज कोसळून चार किरकोळ तर दोघे गंभीर जखमी

३३७६
टोप : जिल्ह्यात शुक्रवारी वळवाच्या जोरदार सरी कोसळल्या. यामुळे येथील पेठवडगाव भुयारी मार्गात सुमारे गुडघाभर पाणी साचले व त्यातूनच वाहतूक सुरू होती.

वीज कोसळून सहा जखमी

दोघे गंभीर; कागल येथील घटना

कागल, कोल्हापूर, ता. १० : जिल्ह्यात आज ठिकठिकाणी वळवाच्या पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. कागल येथे दुपारी अडीचच्या सुमारास वीज कोसळून सहाजण जखमी झाले. येथील नवोदय विद्यालयाशेजारील माळावर पावसावेळी वीटभट्टी झाकत असताना ही घटना घडली असून, जखमींपैकी दोघे गंभीर आहेत.
येथील नवोदय विद्यालयात शेजारील माळावर सतीश कुंभार यांची वीटभट्टी आहे. आज दुपारी वळवाचा जोरदार पाऊस झाला. वादळी पाऊस आल्याने कुंभार यांच्यासह सहाजण विटांवर ताडपत्री झाकत होते. सतीश गंगाराम कुंभार, छाया गंगाराम कुंभार, साधना सतीश कुंभार, नागेश अशोक कासोटे, उमेश विजय घाऊट, दीपक सदाशिव शिरोळे हे सर्वजण पावसाने भिजले होते.
यावेळी ताडपत्रीवरील सुती दोरीही भिजली होती. ती दोरी ओढत असताना वीज कोसळली. यावेळी विजेचा धक्का बसून सर्वजण काहीकाळ बेशुद्ध पडले. चौघांना किरकोळ धक्का बसला, तर उमेश विजय घाऊट (शाहूनगर, लिंगनूर) आणि दिपक शिरोळे (लिंगनूर दुमाला) यांना विजेचा जोराचा धक्का बसला. दोघांनाही तातडीने दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. घाऊट यांना सीपीआर रुग्णालयात, तर शिरोळे यांना कागल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर शिरोळे यांची तब्येत बरी झाल्याने सायंकाळी त्यांना घरी पाठवण्यात आले, तर घाऊट यांच्यावर उपचार सुरू आहेत.


०००

जिल्ह्यात वळवाची हजेरी

- हातकणंगले, भुदरगड, कागल, आजरा, चंदगड तालुक्यांत जोरदार हजेरी
- सेनापती कापशीत झाडे उन्मळली
- कसबा सांगाव येथे गटारींचे पाणी घरात, नारळीचे झाड घरावर पडून नुकसान
- कोनवडेत शेडचे पत्रे वाऱ्याने उडाले.
- कोवाड येथे झाडे पडून वाहतुकीला अडथळा
- टोप परिसरात घरांचे पत्रे उडाले
(सविस्तर बातम्या पान... वर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com