प्रीपेट मीटर सक्ती मागे घ्या,

प्रीपेट मीटर सक्ती मागे घ्या,

प्रीपेट मीटर सक्ती मागे घ्या,
अन्यथा तीव्र आंदोलन

कागल, ता. १० : वीज वितरण कंपनीमार्फत ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती केली जात आहे. शासनाने ही सक्ती लादू नये. निर्णय त्वरित रद्द करावा, अन्यथा तालुक्यात महावितरणच्या कार्यालयांवर धडक मोर्चा काढू, असा इशारा कागल तालुका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वीज वितरण कंपनीला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याची सक्ती केली जात असल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशावर भुर्दंड पडणार आहे. हा निर्णय केंद्र व राज्य शासनाने रद्द करावा. निर्णय रद्द न केल्यास तालुक्यात वीज चोरीचे प्रमाण वाढेल. त्यामुळे सरकारने या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष घालून निर्णय त्वरित रद्द करावा. अन्यथा कागल तालुका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करू.
निवेदनावर उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, शिवगोंड पाटील, लक्ष्मण लाड, आदिनाथ पाटील, अजित मोडेकर, जी. आर. काशीद, शीतल मुळे, आदिनाथ पाटील, मारुती पुरीबुवा, अशोक पाटील, दिग्विजय पाटील यांच्यासह आहेत. यावेळी शिवसैनिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com