कागल : तालुका आरोग्य वार्तापत्र

कागल : तालुका आरोग्य वार्तापत्र

Published on

कागल पंचायत समितीची
आरोग्यसेवा तालुक्यात सज्ज

सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. ३ : पावसाळा सुरू झाला असून, नवीन पाण्याबरोबर साथजन्य आजारांचा धोका वाढला आहे. यासाठी कागल पंचायत समितीची आरोग्यसेवा ग्रामीण भागासाठी सज्ज झाली आहे. सध्या तालुक्यात डेंगीचा एकही रुग्ण नाही, तर काविळीचे संशयित १४ रुग्ण आहेत.
तालुक्यातील आशा स्वयंसेविकांची मासिक बैठक घेऊन कावीळ व डेंगीबाबत जनजागृती करण्यात आली. काही ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात येत आहेत. पावसाळ्यात सर्दी, खोकल्याचे प्रमाण जास्त असते. त्या अनुषंगाने आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत त्याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांत जनजागृतीसाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, आरोग्याची काळजी घ्यावी, आदी सूचना देण्यात येत आहेत. तालुक्यातील सर्वच आरोग्य केंद्रांनी मुबलक औषधसाठा उपलब्ध करून ठेवला असून, कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्यास सांगितले आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फारुख देसाई म्हणाले, ‘तालुक्यात दर गुरुवारी डास संहारक दिन साजरा करण्यात येतो. आतापर्यंत ३५ गावांचे सर्वेक्षण केले आहे. यातील ४६२० घरांच्या सर्वेक्षणात १० हजार ९३ कंटेनर तपासले. यामध्ये ८० कंटेनर दूषित आढळून आले. ४६ कंटेनरमध्ये टेमीफॉस टाकले, तर ४४ कंटेनर रिकामे केले आहेत.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.