‘हेल्थ फाॕर हर’ उपक्रम रविवारपासून ः घाटगे

‘हेल्थ फाॕर हर’ उपक्रम रविवारपासून ः घाटगे

Published on

‘हेल्थ फाॕर हर’ उपक्रम
रविवारपासून ः घाटगे

सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. ४ : ‘महिलांच्या निरोगी आरोग्य आणि सुखद जीवनासाठी सामाजिक चळवळ म्हणून ''हेल्थ फाॕर हर'' ही मोहीम रविवार (ता. ७) पासून कागल तालुक्यातील हसुर खुर्द येथून राबविण्यात येणार असल्याची माहिती राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्ष नवोदिता घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.
घाटगे यांनी पत्रकात म्हटले आहे की, जागतिक पातळीवर तसेच भारतामध्ये सध्या सर्वात जास्त भेडसावणाऱ्या समस्यांपैकी एक धोका म्हणजे स्त्रियांना होणारा स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाला होणारा कर्करोग. स्त्रियांच्या या गंभीर आजारावर मात करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन केले आहे. विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन, राजमाता जिजाऊ महिला समिती तसेच या मोहिमेचे प्रमुख विवेक सुतार (सामाजिक अभिवक्ता) यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविली जाणार आहे. आपण या आजाराला पळवून लावण्यासाठी खूप कमी पडतोय आणि आज आपल्या देशामध्ये एक लाख कर्करुग्णांपैकी ४० हजार रुग्ण दगावले जात आहेत, हे वास्तव आहे. दिवसेंदिवस स्त्रियांना होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. तसेच स्त्रियांना होणाऱ्या स्तनाच्या, गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत देशात स्क्रिनिंग टेस्ट होत नाहीत. लोकांमध्ये एखाद्या आजाराबाबत शिक्षण, जाणीव आणि जागृती करणे आणि त्याचबरोबर तो आजार झाल्यास उपचार सुलभ मिळावे यासाठी ही मोहीम राबवित आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.