कागलसाठी ३८ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर

कागलसाठी ३८ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर

Published on

कागलसाठी ३८ कोटींची
पाणीपुरवठा योजना मंजूर

पालकमंत्री मुश्रीफ यांचे प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. ८ : महाराष्ट्र राज्याच्या नगरोत्थान महाअभियानांतर्गत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कागल नगरपरिषदेला ३७ कोटी ९९ लाख रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी दिली. कागल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, चंद्रकांत गवळी, नवल बोते, प्रवीण काळबर प्रमुख उपस्थित होते.
गाडेकर म्हणाले, ‘पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून कागलचा चौफेर विकास झाला आहे. कागल शहरासाठी सध्या दोन पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. मंत्री मुश्रीफ यांनी शहराच्या पुढील ४० वर्षांच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन ३७ कोटी ९९ लाख रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. ही तिसरी पाणीपुरवठा योजना ६० किलोमीटर अंतराची आहे. या योजनेतून शहर आणि उपनगरांत पाच नवीन टाक्या उभारण्यात येणार आहेत. त्यातून कागल शहराचा पुढील ४० वर्षांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार व पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.’
यावेळी सुनील माने, संजय चितारी, अस्लम मुजावर, सुधाकर सोनुले, सौरभ पाटील, इरफान मुजावर, युवराज लोहार, संग्राम लाड, आशाकाकी माने, संगीता गाडेकर, पद्मजा भालबर यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.
.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.