कागल : एस. टी आगाराशेजारी होणार इलेक्ट्रिक बस चार्जिंग सेंटर

कागल : एस. टी आगाराशेजारी होणार इलेक्ट्रिक बस चार्जिंग सेंटर
Published on

कागल आगाराशेजारी होणार
इलेक्ट्रिक बस चार्जिंग सेंटर

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा निर्णय ः निविदा प्रसिद्ध

सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. ३० : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात लवकरच इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. त्यासाठी महामंडळाने बस चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील कागल आगाराच्या आवारात हे चार्जिंग स्टेशन होणार आहे. याबाबतची निविदा महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. एकावेळी बारा बसेस चार्ज करण्यासाठी बारा चॅर्जिंग पॉईंट काढण्यात येणार आहेत.
पुणे-बंगळूर महामार्गालगत ही जागा असल्याने राज्यातील अनेक आगारांतील इलेक्ट्रिक बसेसना याचा फायदा होणार आहे. परिवहन महामंडळाने आपल्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच पाचशे बसेस खरेदी करून त्या राज्यभरातील एस. टी. आगारात पाठविण्यात येणार आहेत. कागल एस. टी. आगारातही यातील काही बसेस दाखल होणार आहेत. त्यासाठी राज्यभरात चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव महामंडळाच्या मुंबई कार्यालयात पाठविला होता. त्याला हिरवा कंदील मिळाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात तीन चॅर्जिंग स्टेशन सुरू करण्यात येणार आहेत. कोल्हापूर येथे असलेल्या चार्जिंग सेंटरची मर्यादा वाढविण्यात येणार आहे, तर कागल व गडहिंग्लज आगारांत प्रत्येकी एक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे.
चार्जिंग स्टेशन निश्चितसाठी विभागीय नियंत्रक यंत्र अभियंता, चालक, विभागीय अभियंता स्थापत्य आणि विद्युत अभियंता यांची समिती स्थापन केली होती. मध्यंतरी या समितीने कागल आगाराशेजारी असलेल्या महामंडळाच्या जागेची पाहणी केली होती. पुणे-बंगळूर महामार्गाशेजारील असलेली ही जागा चार्जिंग स्टेशनसाठी निश्चित केली आहे. प्रस्तावित नवीन बसस्थानकासाठी ही जागा आरक्षित केली होती. मात्र, या जागेत आता चॅर्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे.
.....
इलेक्ट्रिक बसेस मिळणार
कागल आगाराची नवीन बसेसची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. यापूर्वी गारगोटी, इचलकरंजी आगारांना नवीन बसेस मिळाल्या आहेत. आता कागल आगारामध्येच इलेक्ट्रिक बस चार्जिंग सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कागल आगाराला इलेक्ट्रिक बसेस मिळण्याची शक्यता आहे.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com