कागल : अज्ञात रानटी प्राण्यांच्या हल्यात ४ बकरी ठार व सात गंभीर जखमी

कागल : अज्ञात रानटी प्राण्यांच्या हल्यात ४ बकरी ठार व सात गंभीर जखमी
Published on

रानटी प्राण्यांच्या हल्ल्यात
४ बकरी ठार; सात गंभीर

कागल, ता. ७ : अज्ञात रानटी प्राण्यांच्या हल्ल्यात ४ बकरी ठार व सात गंभीर जखमी झाली. येथील रामचंद्र शिंगू शेळके यांच्या शेतात तीन ते चार दिवसांपासून खतासाठी येथील मेंढपाळ कुमार गंगाराम गोरडे यांची बकरी बसविली होती. दरम्यान, मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास अज्ञात रानटी प्राण्याने या बकऱ्याच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यात कुमार गोरडे यांची बकरी तीन बकरी ठार व सात बकरी गंभीर जखमी झाली. यामध्ये मेंढपाळाचे सुमारास एक लाख रुपयाचे नुकसान झाले.
दरम्यान, ही घटना समजताच यशवंत बिग्रेड जिल्हाध्यक्ष संदीप हजारे यांनी वनरक्षक ओंकार भोसले व जगदाळे व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बोंगार्डे यांना कळवली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यशवंत बिग्रेड संस्थापक अध्यक्ष संतोष कोळेकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमोल गावडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कैलास काळे, पन्हाळा तालुकाध्यक्ष प्रकाश गोरड,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा सीमा झोरे, जिल्हा महिला अध्यक्षा योगिता घुले, कागल तालुका अध्यक्ष नवल रानगे, यशवंत गोरडे, म्हाळू शेळके, शिवाजी गोरडे, रामचंद्र शेळके आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com