

‘पाटबंधारे’चा धडक वसुलीचा निर्णय
२० मार्चपर्यंत पाणीपट्टी न भरल्यास कृषिपंप सील, विद्युत परवाना रद्द
सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. १४ : पाटबंधारे प्रकल्पाद्वारे सिंचन व बिगर सिंचन वापरासाठी पाणी पुरविण्यात येते. या पाणी वापरासाठी शुल्क आकारले जाते. सिंचन व बिगर सिंचन वापरासाठी वेगवेगळी पाणीपट्टी आकारली जाते. कागल पाटबंधारे विभागाकडील खासगी बागायतदार, सहकारी पाणीपुरवठा संस्था, पाणी वापर संस्था व सर्व परवाना संमतीधारक यांनी २० मार्च पर्यंत पाणीपट्टी न भरल्यास कृषिपंप सील करणे तसेच विद्युत परवाने रद्दच्या कारवाईला संबंधितांना तोंड द्यावे लागणार आहे.
कागल पाटबंधारे विभागाकडे दूधगंगा नदी, डावा कालवा, बिद्री शाखा कालवा, व्हन्नूर व शेंडूर लघु पाटबंधारे तलाव असे एकूण कागल, शिरोळ करवीर व हातकणंगले तालुक्यातील कार्यक्षेत्र आहे. पाटबंधारे प्रकल्पाद्वारे सिंचन व बिगर सिंचन वापरासाटी पाणी पुरविण्यात येते. यामध्ये खासजगी बागायतदार, सहकारी पाणीपुरवठा संस्था, पाणी वापर संस्था व सर्व संमतीधारक यांचा समावेश आहे. या पाणी वापरासाठी शुल्क आकारले जाते. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये जलसंपदा मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार यंदाही जुन्या दरानेच म्हणजे हेक्टरी ११२२ रुपयांप्रमाणे पाणीपट्टी आकारण्यात येत आहे.
कार्यक्षेत्रातील वसुलीसाठी कागल पाटबंधारे विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संबंधित वापरकर्त्यांपर्यंत पोहोचून पाणीपट्टी भरण्याबाबत प्रत्यक्ष भेटून आवाहन केले आहे. बहुतांश जणांनी पाणीपट्टी भरली आहे, पण काहींनी अद्याप भरलेली नाही. पाणीपट्टी न भरणाऱ्यांबाबत आता पाटबंधारे विभागाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या २० मार्चपर्यंत संबंधितांनी पाणीपट्टी न भरल्यास त्यांचे मोटर सील करणे तसेच विद्युत परवाने रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी बागायतदार, सहकारी पाणीपुरवठा संस्था, पाणी वापर संस्था व सर्व संमतीधारक यांनी पाणीपट्टी भरावी, असे आवाहन केले आहे. पाणीपट्टी न भरल्यास संबंधिताना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
.............
चौकट....
थकीत पाणीपट्टी भरण्याबाबत सर्व बागायतदारांना वेळोवेळी सूचित केले आहे. तसेच प्रत्यक्ष गाव भेट उपक्रमाद्वारे पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाणीपट्टी भरण्याबाबत सर्व शेतकऱ्यांना विनंती केली आहे. अनेकांनी प्रतिसाद देत पाणीपट्टी भरली आहे. अजूनही काहींची पाणीपट्टी थकीत आहे. अशा लोकांनी आपली तसेच आपल्या संस्थेची पाणीपट्टी भरून पाटबंधारे विभागाला सहकार्य करावे.
- राजेंद्र आरगे, शाखा अभियंता, पाटबंधारे शाखा कागल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.