

8031
कागल : येथील डी. आर. माने महाविद्यालयात उद्योजकता शिबिरात प्रमाणपत्र वितरण करताना विजयसिंह भोसले, डॉ. नंदकुमार कदम, प्रा. जे. टी. सावंत, समन्वयक ईश्वरी नाईक.
.........
माने महाविद्यालयात
उद्योजकता विकास शिबिर
कागल, ता. १४ : येथील डी. आर. माने महाविद्यालयातील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागामार्फत उद्योजकता शिबिर झाले. शिबिराचा समारोप व प्रमाणपत्र वितरण समारंभ महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह भोसले, संस्थेचे संचालक बिपिन माने, प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम, विभागप्रमुख प्रा. जे. टी. सावंत, समन्वयक ईश्वरी नाईक यांच्या उपस्थितीत झाला.
शिबिरात विजय जाधव यांनी ‘उद्योजकाच्या अंगी असणारे गुण’, मनीषा झोले यांनी ‘व्यवसाय कसा करावा’ या विषयावर मार्गदर्शन करत कथाकथन करून मनोरंजन केले. विजयसिंह भोसले यांनी उद्योजकता निर्माण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे मार्गदर्शन केले. प्राचार्य नंदकुमार कदम म्हणाले, ‘स्वतःच्या पायावर उभे राहा, स्वावलंबी व्हा, उद्योगनिर्मिती करा. इतरांना रोजगार द्या. नवनवीन कल्पनाशक्तीचा वापर कराल तर नक्कीच यशस्वी व्हाल.’
शिबिराच्या यशस्वितेसाठी कॅप्मस डायरेक्टर डॉ. प्रवीण चौगले, सचिव भैय्या माने, उपाध्यक्ष सुनील माने यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. जे. टी. सावंत यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एम. एम. चौगुले यांनी आभार मानले. डॉ. एस. एस. कातवरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एम. एम. चौगुले यांनी संयोजन केले. कार्यक्रमास प्रा. एच. आर. मोमीन, प्रा. पी. एच. पाटील, प्रा. टी. एस. शेख, भगवान कांबळे, प्रथमेश गोंधळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.