कागल : १५ वर्षानंतर कागलमध्ये रंगणार राज्यस्तरीय डे नाईट क्रिकेट सामन्यांचा थरार ,

कागल : १५ वर्षानंतर कागलमध्ये रंगणार राज्यस्तरीय डे नाईट क्रिकेट सामन्यांचा थरार ,
Published on

कागलला दोन ते सहा एप्रिल
राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. १८ : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा २ ते ६ एप्रिल या काळात होणार आहेत. स्पर्धेसाठी पहिले बक्षीस एक लाखाचे आहे.
स्पर्धा येथील शाहू स्टेडियमवर खेळविण्यात येणार असून, सर्व सामने यू ट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. स्पर्धा अधिक पारदर्शक होण्यासाठी भव्य स्क्रीनही लावण्यात येणार आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन गटांत स्पर्धा खेळवली जाणार आहे. प्रथम क्रमांक विजेत्या संघाला माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्याकडून एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या संघास माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर व अर्जुन नाईक यांच्याकडून ५१ हजार एक रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाच्या विजेत्या संघाला अमर सणगर यांच्याकडून २१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच चौथ्या क्रमांकासाठी अमित गुटुबाळे यांच्याकडून २१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
अक्षय शेळकेप्रेमी यांच्यावतीने स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांनी निखिल कुसाळ, प्रशांत दळवी, राहुल सूर्यवंशी, रूपेश बोते, अझरुद्दीन ताशीलदार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धा समितीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com