कागल : ठिय्या आंदोलन

कागल : ठिय्या आंदोलन
Published on

8056
कागल : येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करताना वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते.
........
महाविहार कायदा बदलासाठी
कागलमध्ये वंचितचे आंदोलन
कागल, ता. १८ : जागतिक वारसा म्हणून मान्यताप्राप्त बौद्धगया येथील महाविहार व्यवस्थापन कायदा तातडीने बदलण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने आज कागल तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच तहसीलदार अमरदीप वाकडे यांना मागण्यांचे निवेदन दिले.
सम्राट अशोक यांनी इ.स.वी. सन पूर्व तिसऱ्या शतकात महाबोधी विहाराचे बांधकाम केले. तथागत गौतम बुद्धांना ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे. त्यामुळे देशातीलच नव्हे तर जगभरातील बौद्ध अनुयायी, भिक्खू आणि पर्यटक या स्थळाला भेटी देतात. मात्र, महाविहारचे नियंत्रण आणि व्यवस्थापन आजही बौद्धांच्या ताब्यात नाही. महाबोधीविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी १९९२ पासून ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलने केली जात आहेत. आज वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने कागल तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून मागण्यांचे निवेदन तहसीलदार वाकडे यांना देण्यात आले. आंदोलनात युवा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे, आशिष कांबळे, हर्षवर्धन कांबळे, विद्याधर देशमुख, सुनील कांबळे, लता कांबळे, नानाजी कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com