कागल : प्रवचनातून उलगडणार प्रभू श्रीरामांचा जीवनपट

कागल : प्रवचनातून उलगडणार प्रभू श्रीरामांचा जीवनपट

Published on

कागलला शुक्रवारपासून श्रीराम नवमी उत्सव
कागल, ता. २५ : येथे श्रीराम नवमी उत्सवअंतर्गत २८ मार्च ते ६ एप्रिल यादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. श्रीराम मंदिर देवस्थान जीर्णोद्धार समितीने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संतश्रेष्ठ श्री गोस्वामी तुलसीदासजी महाराजांच्या ''श्रीराम चरित मानस'' ग्रंथावर आधारित ''रामकथा'' विषयावरील प्रवचनकार कांचनताई धनाले यांची सुश्राव्य प्रवचनातून प्रभू श्रीरामांचा जीवनपट भक्तांना अनुभवता येईल.
शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी चार ते पाच दरम्यान इच्छापूर्ती कलशपूजन होईल. त्यानंतर पाच एप्रिलपर्यंत दररोज सायंकाळी पाच ते सात या दरम्यान धनाले यांचे ''श्रीरामकथा'' प्रवचन होईल. यामध्ये श्रीराम कथा आरंभ बालकांड, श्रीराम जन्म, श्रीराम जानकी स्वयंवर, अयोध्या कांड, श्रीराम प्रभूंचे वनगमन, अरण्यकांड, किष्कींधाकांड, सुंदरकांड, लंका कांड, उत्तराखंड पारायण समाप्ती असे शुक्रवार चार एप्रिलपर्यंत सायंकाळी चार ते पाच या दरम्यान पर्यंत प्रवचन होईल. दुपारी तीन ते सायंकाळी पाच दरम्यान विविध भजनी मंडळांची संगीत हरिभजन सेवा होईल. शनिवार (ता. ५) सकाळी दहा ते बारा दरम्यान पारायण समाप्ती होईल. सायंकाळी सहा ते सात यादरम्यान भक्तिगीतांवर आधारित भरतनाट्यम् कार्यक्रम होईल. रविवारी (ता. ६) सकाळी दहा ते बारा यादरम्यान भजन तर दुपारी बाराला श्रीराम जन्मकाळ आरती व सुंठवडा प्रसाद वाटप होईल. खर्डेकर चौकातील प्रभू श्रीराम मंदिरमध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com