

कागलला श्रीराम मंदिरात आज
भरतनाट्यम्, उद्या जन्मकाळ
कागल, ता. ४ : येथील श्रीराम मंदिरात शनिवारी (ता.५) भक्तिपर गीतांवर आधारित ‘भरतनाट्यम’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्री रामनवमीनिमित्त श्रीराम मंदिर देवस्थान जीर्णोद्धार समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तपस्यासिद्धी स्कूल भरतनाट्यम् तसेच प्रतिनंद कला मंदिरचे कलाकार भरतनाट्यमचे सादरीकरण करणार आहेत.
श्रीराम नवमीनिमित्त येथे आठवडाभर संतश्रेष्ठ श्री गोस्वामी तुलसीदासजी महाराज यांच्या ‘श्रीराम चरित मानस’ या मराठी ग्रंथावर आधारित प्रवचनकार कांचनताई धनाले यांचे ‘रामकथा प्रवचन’ सुरू आहे. या माध्यमातून प्रभू श्रीरामांचा जीवनपट ओघवत्या शैलीत धनाले यांनी मांडला आहे. सकाळी दहा ते बारा दरम्यान उत्तराखंड पारायण समाप्ती होईल, तर सायंकाळी सहा ते सात या दरम्यान भरतनाट्यमचा कार्यक्रम होईल.
रविवारी (ता.६) दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात येणार आहे. सर्व कार्यक्रमांमध्ये भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.