

8383
कागल : येथील प्लँट लायब्ररी नर्सरीमधील रोपे खरेदी करताना ग्राहक.
...........
यंदा नर्सरी व्यवसायाला अच्छे दिन
फळ-फुलझाडांना विशेष मागणी ः ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नरेंद्र बोते ः सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. ११ : यंदाच्या समाधानकारक पावसाच्या सुरुवातीने निसर्गप्रेमींमध्ये हुरूप वाढला असून, नर्सरींमध्ये फळझाडे, फुलझाडे व शोभिवंत रोपांची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. नर्सरींमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची वर्दळ असून, अनेकजण प्रत्यक्ष जाऊन झाडांची निवड करत आहेत. फळ व फुलझाडांना विशेष मागणी असल्याचे नसरीचालकांचे म्हणणे आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन नर्सरीचालकांनीही मोठ्या प्रमाणात रोपांची विक्रीसाठी तयारी ठेवली आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू होताच नवी झाडे लावण्याचा ट्रेंड असतो. यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने नर्सरी व्यवसायाला बूस्ट मिळाला आहे. उन्हाळ्याच्या शेवटीच नर्सरीचालकांनी विविध प्रकारची रोपे तयार ठेवली होती. गेल्या महिन्याभरात ही रोपे विक्रीसाठी उपलब्ध केली असून, ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
फळझाडांमध्ये आंबा, पेरू, चिकू,सीताफळ, रामफळ, फणस, आवळा, ॲपल बोर, ॲपल, लिची, चिंच व पांढरे जांभूळ या झाडांना सर्वाधिक मागणी आहे. याशिवाय एटीएम आंबा, बनाना मँगो व एटीएम फणस यांची ही मागणी ग्राहकांकडून होत आहे.
फुलझाडांमध्ये गुलाब, जास्वंद, मोगरा, जाईजुई , सोनचाफा, साधा चाफा, शेवंती ही रोपे विकली जात आहेत, तर शोभिवंत झाडे, विशेषतः रंगीत पानांची व वेगवेगळ्या आकारांची रोपे उपलब्ध असून, तीही विशेष आकर्षण ठरत आहेत. तसेच आरेकापाम, बॉटलपाम, फॉक्सटेल पाम, रॅफिस पाम या पाम जातीच्या रोपांची मागणी आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच निसर्गसौंदर्य वाढविण्याची तयारी सुरू झाली असून, यंदा नर्सरी बहरल्या आहेत. पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे जनतेचा कल वाढला असल्याचे चित्र या उत्साही खरेदीवरून दिसून येत आहे.
.....
चौकट...
यंदा देशी वृक्षांनाही मागणी
मोठ्या आकाराच्या झाडांनाही चांगली मागणी आहे. यामध्ये देशी वृक्षांकडे ग्राहकांचा कल आहे. बकुळ, बुच , टर्मिनेलिया, अर्जुन, ताम्हण, बहावा, कडूनिंब, वड, पिंपळ या देशीवृक्ष रोपांची मागणी होताना दिसत आहे. झाडे जगण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांना पसंती मिळत आहे.
.....
कोट...
यंदा पावसाला समाधानकारक सुरुवात झाल्याने फुल व फळांच्या रोपांची विक्री चांगली होईल असा अंदाज आहे. गतवर्षी नर्सरीचालक अडचणीत होते, पण यंदा अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे. रोपे खरेदीसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे. औषधी तसेच देशी वृक्षांची मागणी यंदा वाढत आहे.
- सुधीर पावडे, प्लँट लायब्ररी नर्सरी, कागल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.