कागल : आंदोलन

कागल : आंदोलन
Published on

पाणंद रस्ता खुला करण्यासाठी
दोन गटांचे चिमगावला आंदोलन

पुन्हा जमिनी देण्यास विरोध

कागल, ता. ७ : कागल तालुक्यातील चिमगाव-भारमलनगर वसाहतीतील पाणंद रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. रस्त्यासाठी पूर्वीच जमीन दिल्याचा आणि त्याबाबत लेखी करार झाल्याचा दावा करत बाधित शेतकऱ्यांनी पुन्हा जमीन देण्यास विरोध दर्शवला. एकाच गावातील दोन गटांनी तहसीलदारांचे लक्ष वेधण्यासाठी आमनेसामने आज आंदोलने केली.
चिमगांव - भारमलनगर वसाहतीमधील ७० वर्षांपासून वहिवाटीत असलेला पाणंद रस्ता खुला करावा, या मागणीसाठी वसाहतीमधील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. संदीप भारमल, विश्वास भारमल, विशाल भारमल, लता कुराडे यांच्या कुटुंबाने ट्रॅक्टरच्या सहाय्याने हा रस्ता नांगरून बंद केला आहे. शेतकरी, विद्यार्थी यांच्यासह लोकांची गैरसोय होत आहे. वाघेश्वरी मठाकडे आणि जांभुळखोरासह इतर गावांना जोडणारा मार्ग आहे. त्यामुळे हा रस्ता खुला करावा, या मागणीसाठी भारमलनगरमधील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. आंदोलनात शिवाजी भारमल, प्रकाश गोधडे, तानाजी भारमल, साताप्पा भारमल, मोहिनी भारमल यांच्यासह २० हून अधिक कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. भारमलनगर वसाहतीकरिता केलेल्या मुख्य रस्त्यात आमच्या जमिनी गेल्या आहेत. आता जवळच्या रस्त्याची मागणी केली जात आहे. मुख्य रस्ता करताना ग्रामपंचायतीने मध्यस्थी केली आहे. रस्त्याच्या कामाकरिता पुन्हा जमीन घेतली जाणार नाही, असे काही कुटुंब प्रमुखांनी लेखी लिहून दिले आहे. आता रस्त्यासाठी जमीन देण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे जमिनी वाचवा, या मागणीकरिता बाधित शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. आंदोलनात संदीप भारमल, विशाल भारमल, विश्वास भारमल, विजय भारमल, रेखा भारमल, रंजना भारमल, सचिन भारमल यांच्यासह बाधित शेतकरी सहभागी झाले होते.
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा रस्ता करावा, या मागणीसाठी कागल तहसील कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढला. तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत वसाहतीमधील ग्रामस्थ, शेतकऱ्यांच्या सोयीकरिता हा रस्ता तातडीने करण्याची मागणी केली. उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com