श्रीनाथ सहकार समुहाची वार्षिक सभा

श्रीनाथ सहकार समुहाची वार्षिक सभा
Published on: 

10426
कागल : येथील श्रीनाथ सहकार समूहाच्या सभेत बोलताना चंद्रकांत गवळी. समोर उपस्थित सभासद.

श्रीनाथ सहकार समुहाची वार्षिक सभा
कागल : संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गवळी यांच्या नेतृत्वाखालील श्रीनाथ सहकार समुहाने सर्वच संस्था उत्कृष्टरीत्या चालवीत अर्थिक स्थैर्य निर्माण केले आहे. आता संस्थेने जिल्हाभर शाखा सुरु कराव्यात, अशी मागणी वार्षिक सर्व साधारण सभेत सभासदांनी केली. समुहातील श्रीनाथ पत संस्था, छत्रपती शिवाजी वाहनधारक पत संस्था यांची २७ वी, तर श्रीनाथ दुध संस्थेची १७ वी वार्षिक सभा येथील कै. उमेश गवळी सभागृहात उत्साहात झाली. अध्यक्षस्थानी चंद्रकांत गवळी होते. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष जयसिंगराव कोकाटे, वाहनधारकचे अध्यक्ष आनंदराव वास्कर, उपाध्यक्ष महेश गवळी, नगरसेविका सुमन गवळी, सर्व संचालक उपस्थित होते. चंद्रकांत गवळी म्हणाले, ‘कोणतेही राजकारण अथवा व्यक्तीगत हित संबध न पाहता केवळ संस्थेचे हित पाहुन निर्णय घेतले आहेत. यामुळे सर्व संस्था अर्थिक दृष्ट्या सक्षम बनल्या आहेत.’ यावेळी पी बी. घाटगे, अशोक जकाते, श्रीकांत नातु, वि. म. बोते, रामसिंग पाटील आदीनीं मनोगत व्यक्त केले. गंगाधर शेवडे यांनी स्वागत केले. अहवाल वाचन संजय चव्हाण यांनी केले. महेश गवळी यांनी आभार मानले. दरम्यान, सभासदांना दर वर्षी प्रमाणे १५ टक्के लाभांश व पाच टक्के बक्षीस दिपावलीला देणार आहोत. दुध फरकही वाटप केले जाणार आहे, असेही गवळी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com