कंदलगाव..इंदिरा घरकुल येथे आंदोलनानंतर पाणीपुरवठा.

कंदलगाव..इंदिरा घरकुल येथे आंदोलनानंतर पाणीपुरवठा.

Published on

इंदिरा घरकुल परिसरात
आंदोलनानंतर पाणीपुरवठा

कंदलगाव, ता. ८ : पाचगाव- आर.के. नगर व महापालिका हद्दीतील सुमारे तीसपेक्षा अधिक कॉलनीना गेल्या पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा होत नसल्याने मंगळवारी (ता. ७) रोजी सायंकाळी इंदिरा घरकुल व परिसरातील संतप्त महिलांनी दोन तास रस्त्यावर घागरी पालथ्या घालून महापालिकेचा निषेध करून रास्ता रोको आंदोलन केले होते.
पाचगाव परिसरासह महापालिका हद्दीतील सुमारे ४० कॉलनींना सुभाष नगर पंपींगमधून पाणीपुरवठा केला जातो. सदर पंपींगमधील दुर्लक्षामुळे पाणी उपसा करणाऱ्या एकुलत्या एक पंपांत वारंवार बिघाड होत असल्याने महिन्याभरापासून या परिसरात फक्त दोन वेळा पाणीपुरवठा झाल्याचे संतप्त महिला बोलतात.
याबाबत पाणीपुरवठा अधिकारी, कर्मचारी कोणतीही सबब, समस्या ऐकून घेत नाहीत. लेखी तक्रार दिली तरी कार्यवाही होत नसल्याने इंदिरा घरकूल व बळवंतनगर परिसरातील महिलांनी सुमारे दोन तासाहून अधिक काळ रास्ता रोको केला.
या आंदोलनात नंदा गवळी, सुशीला भोसले, मालिनी चौगुले, शोभा अरसिद्ध, अनिता लोखंडे ,विजयमाला राजमाने ,मंगल चौगुले ,मनीषा काशीद ,प्रतिभा जाधव, गीता गाडे, भाग्यश्री पाटील, सुप्रिया कुरणे ,तेजश्री गवळी ,वंदना तटकरे ,सुनीता पाटील, सुमित्रा गवस, भारती गावडे सहभागी झाल्या होत्या.
या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प होऊन आर. के. नगरपर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या ठिकाणी माहिती देऊनही अधिकारी, कर्मचारी आले नसल्याने नागरिकांनीच संयम राखून आपले आंदोलन मागे घेतले. काही वेळाने याची माहिती पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना समजताच बुधवारी (ता. ८)संबंधित परिसरात टँकरने पाणीपुरवठा करून सायंकाळी नियमितप्रमाणे पाणीपुरवठा केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.