प्रस्तावित अन्यायकारक वीज दरवाढ रद्द करा

प्रस्तावित अन्यायकारक वीज दरवाढ रद्द करा

Published on

04299
कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनतर्फे वीज दरवाढीविरोधात सह्या घेऊन आंदोलन करण्यात आले. (छायाचित्र : प्रकाश पाटील)

प्रस्तावित अन्यायकारक
वीज दरवाढ रद्द करा
मनसेचे सह्यांच्या मोहिमेद्वारे आंदोलन
कोल्हापूर, ता. ९ : महावितरणने वीज आयोगाकडे केलेल्या प्रस्तवित दरवाढीला विरोध करीत मनसेने आज महाद्वार रोड येथे सह्यांची मोहीम राबवत आंदोलन केले. या अन्यायी वीज दरवाढीविरोधात जिल्ह्यातून एक लाख सह्या घेणार असल्याचे शहर अध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी सांगितले.
फक्त वीज दरवाढ करणे हा पर्याय नसून, विजेची अंतर्गत गळती कमी करणे, थकबाकीची वसुली करण्यासाठी प्रयत्न करणे, अवाजवी खर्च कमी करणे, कामाचे योग्य नियोजन करणे, भ्रष्टाचार कमी करणे, कर्मचाऱ्यांनी स्पर्धात्मक मानसिकता तयार करणे आवश्यक आहे. हे काहीच न करता अवाजवी दरवाढीची मागणी चुकीची आहे. राज्यातील वीज ग्राहकांच्यामाथी तब्बल ३७ टक्के दरवाढीचा बोजा टाकायचे वितरण कंपनीने ठरविलेले आहे. शेजारच्या राज्यात वीज दर खूपच स्वस्त आहे. कंपनीने योग्य नियोजन केल्यास दरवाढ करायची गरज भासणार नाही. त्यामुळे ही दरवाढ फेटाळण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
मनसे शहर अध्यक्ष राजू दिंडोर्ले, नीलेश धुम्मा, अभिजित राऊत, प्रसाद पाटील, अमित पाटील, यतीन होरणे, नीलेश आजगावकर, रणजित वरेकर, राजन हुल्लोळी, चंद्रकांत सुगते, दिलीप पाटील, अमित साळुंखे, सूरज कानुगडे, सागर साळोखे, सुनील तुपे, प्रसाद साळोखे, गणेश शिंदे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.