
प्राधिकरण सक्षम बनवणार; आमदार ऋतुराज पाटील
04371
कोल्हापूर : नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणात माहिती घेताना आमदार ऋतूराज पाटील , प्राधिकरण अधिकारी संजय चव्हाण व इतर.
प्राधिकरण सक्षम बनवणार
आमदार ऋतुराज पाटील; कामकाजाचा घेतला आढावा
कंदलगाव, ता. २३ : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर मतदारसंघातील ११ गावांसह एकूण ४२ गावांना भरीव विकास निधी उपलब्ध करून दिला जाईल. हे प्राधिकरण अधिक सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाईल. रिक्त पदे भरून कर्मचारी संख्या वाढवण्यासाठीही प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. प्राधिकरण कार्यालयाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.
आमदार पाटील यांनी कार्यलयात कामकाजाचा आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार चव्हाण आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय माने यांनी पाटील यांचे स्वागत केले. कामकाजाबाबतची माहिती देताना कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कार्यपद्धतीवर मर्यादा येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सध्या केवळ पाच कोटींचा निधी शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, दक्षिण कोल्हापूर मतदारसंघातील ११ गावांसाठी जास्तीत - जास्त विकास निधी या प्राधिकरणाच्या माध्यमातून मिळवून दिला जाईल, असे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.
पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील यांनी भारती विद्यापीठ कॉलेज ते गिरगाव रोडच्या प्रस्तावित रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांची सहकार्याची तयारी असल्याचे सांगितले. सर्व शेतकरी आणि प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन याबाबत तोडगा काढला जाईल, असे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले. विराज पाटील यांनी मोरेवाडी परिसरातील प्रलंबित विकास कामांसाठी लागणाऱ्या निधीबाबतची माहिती दिली. या वेळी सहाय्यक नगर रचनाकार सिद्धांत राऊत यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.