ओपन बार, हद्दपार गुन्हेगारांचे वास्तव्य

ओपन बार, हद्दपार गुन्हेगारांचे वास्तव्य

समस्यांच्या गर्तेत
बोंद्रेनगर भाग : ६


हद्दपार गुन्हेगारांच्या वास्तव्याने अशांतता
पोलिस ठाण्याची गरज ठळक; ओपन बारसह अवैध व्यवसाय वाढले
प्रकाश पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : बोंद्रेनगर, फुलेवाडी हा परिसर शहराच्या हद्दीवर असल्याने व इथून पसार होण्यासाठी रिकामा माळ, शेतवड, रिंग रोड सारखा प्रशस्त रस्ता असल्याने या परिसरात हद्दपार असणारे गुन्हेगार, ओपन बार, गांजा विक्री, जुगार, गुटखा, मावा विक्री जोमात आहे. या मुळे सामाजिक शांततेला बाधा येते. यासाठीच या परिसरात पोलिस ठाण्याची मागणी होत आहे, मात्र अनेक वर्षापासून या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने गुन्हेगारी वाढत असून काही कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.
येथे सीसीटीव्ही नसल्यानेही चोरांचे धाडस वाढलेले आहे. अनेकदा खासगी सीसीटीव्ही मालकांची मदत घ्यावी लागते, मात्र त्याला मर्यादा आहेत.
--------
चौकट
तपासात हद्दीचा अडथळा ..
फुलेवाडी - कळंबा रिंग रोडची पश्चिम बाजू करवीर पोलिसांच्या हद्दीत, तर पूर्व बाजू राजवाडा पोलिसांच्या हद्दीत यामुळे रिंगरोड घडलेल्या गुन्ह्याचा तपास कोणी करायचा हा प्रश्‍न उपस्थित झाल्याने अनेकदा तपासात हद्दीचा अडथळा होतो. (समाप्त)
-------------
खुन्नस देण्याचे प्रकार वाढले
हा परिसर मोठ्या लोकवस्तीने गजबजलेला आहे. परिसरात अनेक व्यवसायिक कामगार राहत आहेत. त्यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य, मंडळातील वाद, व्यावसायिक संघर्ष या कारणाने गुन्हे घडत आहेत. त्यातून एकमेकांना खुन्नस देण्याचे प्रकार घडत आहेत. ---------------
कोट
हा परिसर ग्रामीण व शहर असा विभागला असला तरी हद्दीवरून तपासात अडथळा येत नाही. सध्या तरी हा परिसर शांत आहे. नियमित पेट्रोलिंग सुरु आहे.
- सुरज बनसोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, करवीर
-------------
कोट
तत्कालीन पोलिस अधीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील व पोलिस निरिक्षक संदिप कोळेकर यांची बैठक घेऊन वाढणाऱ्या गुन्हेगारी बद्दल जनजागृती केली होती. त्यावेळी आशा गुन्हेगारीला पायबंद बसेल असा नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण झालेला होता. भागातून पोलिस चौकी बद्दल निवेदन सुद्धा दिले आहे.
- विजय तायशेटे, स्थानिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com