कोल्हापूर . .स्त्रियांनी अखिल भारतीय ग्राहक पंचांच्या कार्यात सक्रिय व्हावे ..आशादेवीसिंह कुशवाह .

कोल्हापूर . .स्त्रियांनी अखिल भारतीय ग्राहक पंचांच्या कार्यात सक्रिय व्हावे ..आशादेवीसिंह कुशवाह .

04678
कोल्हापूर ः ग्राहक पंचायतीच्या कार्यक्रमात ग्राहकतीर्थ विशेषांक २०१३ चे प्रकाशन करताना मान्यवर.

महिलांनी अखिल ग्राहक पंचांच्या
कार्यात सक्रिय व्हावे ः कुशवाह

कोल्हापूर, ता. १० ः काम सुनियंत्रितपणे पूर्ण होण्यासाठी संघ तयार करणे आणि प्रत्येकाला जबाबदारी वाटून देणे आवश्‍यक आहे. दैनंदिनीत जास्त खरेदी ग्राहककार्य हे स्त्रिया करतात. त्यामुळे महिलांनी ग्राहक पंचायतच्या कार्यात सक्रिय व्हावे, असे आवाहन ग्राहक पंचायतच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आशादेवी सिंह कुशवाह यांनी केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिवाजीराव देसाई सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
प्रांताध्यक्ष बाळासाहेब ओटी, प्रसाद बुरांडे, संदीप जंगम, सुप्रिया दळवी, एन. ए. कुलकर्णी, राजश्री दीक्षित, रवींद्र घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुशवाह म्हणाल्या, ‘‘सध्याच्या काळात व्यवहारातील प्रत्येक गोष्ट ग्राहक पंचायतपर्यंत येऊन पोहोचते म्हणूनच या माध्यमातून आपण ग्राहक साक्षरता आत्मसात करणे आवश्‍यक आहे. संस्कार चांगले दिले तर ग्राहकही चांगला बनेल.’’
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त घेतलेल्या निबंध स्पर्धा स्पर्धेतील विजेत्यांना गौरविले. ग्राहकतीर्थ विशेषांक २०२३ चे प्रकाशन प्रमुख पाहण्यांच्या हस्ते झाले.
जिल्हा अहवाल वाचन जिल्हाध्यक्ष सुप्रिया दळवी यांनी केले. सचिव विनायक वाळवेकर यांनी महानगर अहवाल वाचन केले. अस्मिता कुलकर्णी यांनी ग्राहक गीत गायले. वैदेही जोशी यांनी पसायदान गायले. सुहास गुरव यांनी स्वागत केले. डॉ. जुई कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. जगन्नाथ जोशी यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com