इंधन बचत, संवर्धनासाठी २४ पासून प्रबोधनात्मक उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंधन बचत, संवर्धनासाठी 
२४ पासून प्रबोधनात्मक उपक्रम
इंधन बचत, संवर्धनासाठी २४ पासून प्रबोधनात्मक उपक्रम

इंधन बचत, संवर्धनासाठी २४ पासून प्रबोधनात्मक उपक्रम

sakal_logo
By

इंधन बचत, संवर्धनासाठी
२४ पासून प्रबोधनात्मक उपक्रम
कोल्हापूर, ता. २० : इंधन बचत व इंधन संवर्धनविषयी वाहनधारक व नागरिकांत जागृती करण्यासाठी २४ एप्रिल ते ८ मे २०२३ या कालावधीत प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरू केले आहेत. या कार्यक्रमांतर्गत पेट्रोल पंप, धाबा, महामार्ग याठिकाणी वाहनधारकांना इंधन बचतीचे महत्व पटवून दिले जाईल, असे भारत पेट्रोलियमचे सेल्स मॅनेजर नानासाहेब सुगांवकर यांनी सांगितले. पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना, पेट्रोलियम-नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयकांनी पुढाकार घेत जनजागृती उपक्रम राबवित आहेत. राज्यात सुमारे ८०० उपक्रम होणार आहेत. इंधन बचत आणि संवर्धनसंबंधीच्या या प्रबोधनात्मक उपक्रमासंबंधी माहिती सांगताना सुगांवकर म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांसाठी समूह संभाषण, वादविवाद स्पर्धेचे नियोजन आहे. इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, लेख लेखन, कॉलेजमधील भित्तीचित्र स्पर्धा होणार आहेत. इंधन आणि तेल संवर्धनासाठी शालेय विद्यार्थी, शिक्षकांना त्यांच्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात येईल.’’ या वेळी भारत पेट्रोलियमचे असिस्टंट जनरल मॅनेजर आकाश गुंडे, तुषार चव्हाण उपस्थित होते.