कोल्हापूर . .शालिनी उद्यान ''ओपन जिम '' चे आरोग्य धोक्यात .. साहित्य मोडकळीस.. महापालिकेचे दुर्लक्ष ..

कोल्हापूर . .शालिनी उद्यान ''ओपन जिम '' चे आरोग्य धोक्यात .. साहित्य मोडकळीस.. महापालिकेचे दुर्लक्ष ..

04784
कोल्हापूर ः रंकाळा येथील शालिनी उद्यानातील ओपन जीम साहित्याची झालेली मोडतोड. (छायाचित्र ः प्रकाश पाटील )


शालिनी उद्यानातील ''ओपन जिम''चे साहित्य मोडकळीस

मनपा प्रशासनाने द्यावे लक्ष
कोल्हापूर ता. २ ः प्रभाग क्रमांक ७१ मधील शालिनी उद्यान ओपन जिमची दुरवस्था झाली आहे. येथे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रादेशिक योजना २०२१ - २२ च्या फंडातून दहा लाख रुपये फंडातून शालिनी उद्यान रंकाळा बोटिंग क्लब येथे ओपन जिम बसवली आहे. तेथील काही साहित्याचा वापर बंद झालेला आहे. तुटलेल्या जिमच्या साहित्यामुळे मुले जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत.
महानगरपालिका प्रशासनाने उद्यानाकडे दुर्लक्ष केल्याने रंकाळा परिसरात कचऱ्याचे ढीग तसेच जीम साहित्याची मोडतोड झाली आहे . या ठिकाणी ग्रीसिंग, ऑइलिंग करणे आवश्यक होते. तसेच नट, बोल्ट निघाले तर ते बसवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने साहित्य अधिकच खराब होत आहे .
जीम साहित्य आणि खेळणी तुटलेली आहेत. ती नियमित दुरूस्त केली जात नाही. बागेत झाडांचा पालापाचोळाही नियमित उचलला जात नाही. पालापाचोळ्यात पाणी साठून डास होत आहेत. परिणामी बागेत येणाऱ्या आबालवृध्दांच्या आरोग्यास यामुळे धोका होऊ शकतो. झाडांच्या वेड्यावाकड्या वाढलेल्या फांद्याही नियमित छाटल्या नाहीत. शिवाय ज्येष्ठांना बसण्यासाठी ठेवलेली बाकडेही झाडाझुडपात अडकल्याने उद्यानप्रेमींची गैरसोय होत आहे. बकाल झालेल्या उद्यानात नागरिकांनीही पाठ फिरवली आहे. पथदिवे देखील नादुरूस्त झाले आहेत.

कोट
शहरातील जीम साहित्य, बगीच्यातील खेळणी यांच्या देखभाल दुरुस्तीबाबत सर्वेक्षण झाले आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
-अनुराधा वांद्रे, कनिष्ठ अभियंता, प्रकल्प विभाग, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com