कोल्हापूर .दलित महासंघाचा वर्धापन सोहळा १० जुलै रोजी ..

कोल्हापूर .दलित महासंघाचा वर्धापन सोहळा १० जुलै रोजी ..

Published on

दलित महासंघाचा
उद्या वर्धापन दिन
कोल्हापूर, ता. ८ : दलित महासंघाचा ३२ वा वर्धापन सोहळा सोमवारी (ता. १०) राजर्षी शाहू स्मारक भवनात दुपारी १ वा. होणार आहे . समारंभाचे उद्‍घाटक म्हणून दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे हे उपस्थित राहणार असून, अध्यक्षस्थान दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे-पाटील भूषवतील. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. सी. बी. कोरे उपस्थित राहतील, अशी माहिती उपाध्यक्ष शंकर महापुरे यांनी दिली. महापुरे म्हणाले, ‘अल्पसंख्याक, भटके, कष्टकरी, कामगार अशा शोषणग्रस्तांना न्याय देण्यासाठी दलित महासंघाने महत्त्वाची भूमिका बजावली. या वेळी राज्यभरातून दलित महासंघाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.’ जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे, प्रा. प्रकाश नाईक, अनिल मिसाळ, विजय समुद्रे, विलास कांबळे, आप्पा कांबळे, सुनील कोरे, प्रा. अमोल महापुरे व मार्तंड वाघमारे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.