मोरेवाडी डेपोतील कचरा रस्त्यावर

मोरेवाडी डेपोतील कचरा रस्त्यावर

Published on

05273
कंदलगाव : आर. के. नगर रस्त्यावर टाकलेला कचरा.

आर. के. नगर रस्त्यावरील
कचरा रस्त्यावर
दुर्गंधीचा त्रास; कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी
प्रकाश पाटील : सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. ११ : मोरेवाडी ग्रामपंचायतीकडून उठाव होणारा कचरा भारती विद्यापीठाशेजारील रिकाम्या जागेत टाकण्यात येतो. हा कचरा डेपो मूळ गावापासून लांब असून तो माळावर आहे. याच ठिकाणी आर. के. नगर रस्त्यावर काही नागरिक कचरा डेपोत न टाकता रस्त्यावर टाकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. म्हणून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
येथील रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्याचा ढीग दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या कचऱ्यातून दुर्गंधी येत असल्याने प्रवासी व स्थानिकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मोरेवाडी ग्रामपंचायतीतर्फे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
----------------
चौकट
एका दिवसात कचऱ्याचा ढीग
अनेकदा मोरेवाडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी रस्त्यावरील कचरा डेपोत टाकतात. रात्रीच्या अंधारात मात्र काही नागरिक येथे कचरा टाकतात आणि स्वच्छता केलेल्या ठिकाणी पुन्हा कचऱ्याचा ढीग नजरेस येतो.
-----------
कोट
या रस्त्यावर अनेक व्यावसायिक, टपरीधारक, चिकन विक्रेते यांसह अन्य व्यावसायिक आहेत. रात्रीच्या वेळी यातील काही व्यावसायिक कचरा टाकताना मी पाहिले आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी.
- राजेंद्र पाटील, स्थानिक.
---------------
कोट
संबंधित कचरा डेपोसाठी मोठा खड्डा काढण्याचे नियोजन आहे. दरम्यानच्या काळात या ठिकाणी फलक लावून जनजागृती करू. तरीही रस्त्यावर कचरा टाकताना कोणी आढळल्यास पाच हजारांचा दंड करण्यात येईल.
- प्रकाश पोवार, ग्रामविकास अधिकारी, मोरेवाडी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.