कंदलगाव ..अपुर्‍या व कमी दाबाच्या पाण्याबद्दल ठोस उपाय करा ..  पाचगाव ग्रा .पं. सदस्यांचे निवेदन ..

कंदलगाव ..अपुर्‍या व कमी दाबाच्या पाण्याबद्दल ठोस उपाय करा .. पाचगाव ग्रा .पं. सदस्यांचे निवेदन ..

Published on

05494
अपुऱ्या, कमी दाबाच्या
पाण्याबद्दल ठोस उपाय करा

पाचगाव ग्रामपंचायत सदस्यांचे निवेदन

कंदलगाव, ता. १८ : पाचगाव ग्रामपंचायत हद्दीमधील प्रभाग क्र ४, ५ व ६ येथे कोल्हापूर महापालिकेमार्फत पाणीपुरवठा होतो. हा पुरवठा पुरेसा व नियमित होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी जलअभियंत्यांना निवेदन दिले.

निवेदनाचा आशय असा ः अनेक दिवसांपासून या प्रभागांतील नागरिकांना महिन्यातून फक्त सहावेळाच पाणी मिळते. तेही जास्तीत जास्त ४०० लिटर. यापूर्वी एक दिवस पाणीपुरवठा होत होता. आता महिन्यातून सहा दिवसच पाणीपुरवठा होतो. नागरिक नोकरी, व्यवसाय सोडून पाणी समस्येला तोंड देत आहेत. याबाबत पाणीपुरवठा विभागांमधील पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यापासून ते मुख्य जलअभियंतापर्यंत लेखी तक्रारी व फोनवरून तक्रारी देऊनही ठोस उपाययोजना नाही. उलट टँकरचे पाणी विकत घेऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या भागात ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. या वयात पाण्यासाठी कुठे कुठे फिरायचं? तक्रारी, चर्चा करूनही प्रश्न सुटत नसल्याने पुन्हा तीव्र जनआंदोलन करावे लागेल.’ यावेळी ग्रामपंचायत सदस्य सागर दळवी, अतुल गवळी, मुमताज मुलाणी तसेच महेश पाटील, अक्षय गाडगीळ, अमोल गवळी, सतीश पाटील, निशिकांत माने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com