कोल्हापूर . .पतसंस्था टिकवण्यासाठी कर्मचार्यांचे भविष्य निश्चित असले पाहीजे..राज्य उपाध्यक्ष रमेशकुमार मिठारे ..

कोल्हापूर . .पतसंस्था टिकवण्यासाठी कर्मचार्यांचे भविष्य निश्चित असले पाहीजे..राज्य उपाध्यक्ष रमेशकुमार मिठारे ..

पतसंस्था टिकवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे
भविष्य निश्चित असावेः रमेशकुमार मिठारे

कोल्हापूर, ता.२१ ःअर्थव्यवस्थेत सहकारी पतसंस्था म्हणजे आर्थिक कणा आहे. अडी-अडचणीच्यावेळी पतसंस्था कर्मचारी एटीएम मशीनप्रमाणे सेवा देतात. त्यामुळे त्यांचे भविष्य निश्चित असले पाहिजे असे मत महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेशकुमार मिठारे यांनी व्यक्त केले. करवीर तालुका पतसंस्था कर्मचारी संघटना स्थापनेप्रसंगी ते बोलत होते.
करवीर तालुक्याचे सहायक निबंधक प्रेमदास राठोड अध्यक्षस्थानी होते. राठोड यांनी करवीर तालुक्यातील पतसंस्थांना सेवानियम लागू करावेत असा आदेश पत्राद्वारे दिला. त्यामुळे राठोड व त्यांचे सहकारी संदीप पाटील यांचे कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.
हातकणंगले तालुका पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पिसे, चंदगड तालुक्याचे कार्याध्यक्ष शांताराम हजगुळकर, तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्रा. एस. टी.जाधव यांनी मार्गदर्शन केले.
करवीर तालुका पतसंस्था कर्मचारी संघटनेचे नूतन संचालक मंडळात अनिल शिरगावे, भिकाजी वनारे, सदाशिव केसरकर, स्वप्निल पाटील, पांडुरंग बिरंजे, विष्णू राऊत, तानाजी नाटेकर, आनंदा शेटे, वाकोजी देसाई, संजय देसाई, राजगोंडा पाटील, सदाशिव पाटील, रंगराव शेळके, भीमराव पाटील, स्वाती दाभोळकर यांची निवड करण्यात आली.
वाकोजी देसाई यांनी स्वागत केले. अनिल शिरगावे यांनी प्रास्ताविक केले. रंगराव शेळके यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com