कंदलगाव .देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूलमध्ये हिवताप जनजागृती..

कंदलगाव .देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूलमध्ये हिवताप जनजागृती..

07695
देशभक्त रत्नाप्पा कुंभार
हायस्कूलमध्ये हिवताप जनजागृती

कंदलगाव, ता. २५ : जागतिक हिवताप दिनानिमित्त जनजागृती करण्याच्या उद्देशाने देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूलमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र कणेरीअंतर्गत कळंबा उपकेंद्रामार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी हिवताप कोणत्या डासामार्फत पसरतो, हिवतापाची लक्षणे व उपाय व उपचार यासंबंधी आरोग्य सेवक राजदीप घोडके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना ॲनाफिलीस डासाची पोस्टर्स व त्यांचे जीवनचक्र समजावून सांगितले. हा कार्यक्रम वैद्यकीय अधिकारी भूषण मस्के, डॉ. श्रेयस कांबळे, आरोग्य सहाय्यक एस. डी. रणदिवे, अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमास मुख्याध्यापक आर. बी. पाटील पर्यवेक्षिका वर्षा बिर्जे व शिक्षक यांच्यासह सुजाता मोरे, जयश्री निळकंठ, प्रियांका मंत्री उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com