कंदलगाव .शिवगर्जनातर्फे युद्धकला प्रशिक्षण शिबीर..

कंदलगाव .शिवगर्जनातर्फे युद्धकला प्रशिक्षण शिबीर..

07697
‘शिवगर्जना’तर्फे युद्धकला
प्रशिक्षण शिबिर

कंदलगाव, ता. २५ ः जरगनगर येथील शिवगर्जना प्राचीन युद्धकाला प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून युद्धकला प्रशिक्षण, पारंपरिक खेळ व राष्ट्रीय दर्जा प्राप्त असलेल्या खेळांचे शिबिर घेण्यात आले.
शिबिरांतर्गत शिवकालीन युद्धकला, सर्वांगसुंदर व्यायाम, योगा, रायफल शूटिंग, ज्युडो, वूशु, थांगता, पारंपरिक लेझीम अशा सर्व खेळांचा समावेश आहे. शिबिरातील राष्ट्रीय खेळासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रशिक्षक प्रशिक्षण देत आहेत. त्याचबरोबर पारंपारिक खेळालाही प्रतिसाद आहे. २५० विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या शिबिरामध्ये समाविष्ट झाले आहेत.
शिबिर पार पाडण्यासाठी संस्थापक अध्यक्ष नाना सावंत, अजय चौगुले, अजय सांगडे, राजेश पाटील, सागर लोहार, अतुल निंबाळकर, रणजीत काळे, हेमंत ढाले, संतोष कांबळे, यश गवळी, पांडुरंग जाधव, राहुल भोसले, पूर्वा भोसले, मल्हार सावंत, युवराज टाक, शुभम सनगर, जानवी लोहार, ईशा भोसले, वृंदा सावंत, जानवी निंबाळकर, स्वरा निंबाळकर व पालकांचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com