कंदलगाव .मूळ सोसायटीतील''तो''कचरा ग्रामपंचायतीने उचलला.. सकाळ Impact..

कंदलगाव .मूळ सोसायटीतील''तो''कचरा ग्रामपंचायतीने उचलला.. सकाळ Impact..

सकाळ Impact..

07861

मूळ सोसायटीतील
''तो'' कचरा उचलला

कंदलगाव, ता. २३ : आर. के. नगर मूळ सोसायटीच्या ओपन स्पेसची स्वच्छता केलेला कचरा अनेक दिवसांपासून रस्त्यावर पडून होता. यामध्ये काही स्थानिकांनीही कचरा टाकल्याने हे कचऱ्याचे ढीग मोठे झाले होते. हा कचरा पावसाळ्यापूर्वी उठाव करावा, अशी स्थानिकांची मागणी असल्याने याबाबत दै. ‘सकाळ’मधून बुधवारी (ता. २२) मूळ सोसायटीच्या कचऱ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात'' या आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. वृत्ताची तत्काळ दखल घेऊन उपसरपंच संजय वास्कर, सोसायटी सचिव पी. बी. पाटील, सुदर्शन पाटील व उमेश मगदूम यांच्या मार्गदर्शानाखाली परिसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसरातील कचरा उठाव केला. चार तास सुरू असलेल्या या मोहिमेसाठी मोरेवाडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी व स्टाफचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com