कंदलगाव .जेसीबीमुळे शेंडापार्क गळतीला मुहूर्त मिळेना.. गळतीच्या खड्डयात अनेक वाहनांचे नुकसान..

कंदलगाव .जेसीबीमुळे शेंडापार्क गळतीला मुहूर्त मिळेना.. गळतीच्या खड्डयात अनेक वाहनांचे नुकसान..

07914

जेसीबी मिळेना, गळती निघेना...
शेंडापार्क चौकात आठवड्यापासून पाणी वाया; खड्डयांमुळे वाहनांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

कंदलगाव, ता. १ : कोल्हापूर महापालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठा जलवाहिनीला शेंडापार्क चौकात आठवड्यापासून गळती लागली आहे. ही गळती मोठ्या प्रमाणावर असल्याने रात्री यातून हजार लिटर पाणी वाया जात आहे. या गळतीबाबत संबंधित विभागाला माहिती असूनही जेसीबी मिळत नसल्याने एक आठवड्यापासून गळती तशीच आहे.
चौकामध्ये गळतीतून वाहत असलेल्या पाण्यामुळे मोठा खड्डा पडला असून रात्री खड्डयात पाणी असल्याने वाहनधारकांना खड्डयाचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक वाहने खड्डयांत आदळून वाहनांचे नुकसान होत आहे. सायबर कॉलेज ते संभाजीनगर रस्त्यावरील शेंडापार्क मुख्य चौकात गळती असल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड व भरधाव वाहतूक असते. येथे भाजी मंडई असल्याने रात्री नागरिकांसह खरेदीदारांची ये-जा सुरू असते. अशावेळी खड्डयाचा अंदाज न आल्याने अपघाताची शक्यता आहे. याबाबत पाणीपुरवठा सुपरवायझर रमाकांत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जेसीबी मिळाला नसल्याचे कारण सांगितले.

चौकट.
पुन्हा पुन्हा तेथेच गळती
दोन महिन्यांपूर्वी या चौकातील पाणी गळती काढली होती. मागील आठवड्यापासून पुन्हा चौकात गळती लागल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात या चौकात याच ठिकाणी गळती लागलेली असते. प्रत्येक वेळी गळती काढण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च होतो. मात्र या खर्चाचा विचार संबंधित विभाग का करीत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चौकट.
खड्डा झाला मोठा
कळंबा फिल्टर हाऊस कडून जवाहरनगर, सुभाषनगर या विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीलाही गळती लागल्याचे समजते. या जलवाहिनीचा पाणीपुरवठा रात्रीच्या वेळेत होत असल्याने गळतीच्या खड्ड्यांत वाहने आदळून खड्डा मोठा झाला आहे.

कोट.
07913
महापालिका पाणीपुरवठा विभागाचे भागातील गळतीकडे दुर्लक्ष आहे. अनेक भागांत पाण्यासाठी वणवण सुरू असून गळतीतून मात्र दररोज हजारो लिटर पाणी रस्त्याने वाहत असते. अधिकाऱ्यांचे गळतीकडे दुर्लक्ष होत आहे.
- धीरज नाईक, आर. के. नगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com