कंदलगाव ,केआयटीच्या सात विद्यार्थ्यांचीआंतरराष्ट्रीय‘ॲटलास कॉप्को’या कंपनीत निवड..

कंदलगाव ,केआयटीच्या सात विद्यार्थ्यांचीआंतरराष्ट्रीय‘ॲटलास कॉप्को’या कंपनीत निवड..

07916
‘केआयटी’च्या सात विद्यार्थ्यांची
ॲटलास कॉप्को कंपनीत निवड

कंदलगाव, ता. १ : केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या तृतीय वर्षाच्या अंतिम सत्रातील ७ विद्यार्थ्यांची ॲटलास कॉप्को कंपनीमध्ये निवड झाली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा नांगरे, आकाश विनोद, कल्याणी वठारकर, प्रेम शिंदे, अनिकाहमद खलिफा, श्रेयस रोडे व वैभव साळोखे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कऱ्हाड येथे झालेल्या निवड प्रक्रियेत ॲप्टिट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन, वैयक्तिक मुलाखत व तांत्रिक मुलाखत या आधारे अंतिम यादीमध्ये या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवडलेल्यांना विद्यार्थ्यांना ६.५ लाखांचे वार्षिक पॅकेज कंपनीने जाहीर केले आहे. इंटर्नशिप व अन्य प्रोजेक्ट माध्यमातून कंपनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करणार आहे. प्रत्येक सुट्टीत अभ्यासाव्यतिरिक्त मेकॅनिकल विभागाने कॅम्पस इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिलेच; पण वेगवेगळ्या मुलाखतींचा सराव करून घेतला. सातत्याने घेतलेल्या प्रशिक्षण वर्गाचा मोठा फायदा झाल्याचे मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ. अमित सरकार, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. उदय भापकर, मेकॅनिकल विभागाचे ट्रेनिंग प्लेसमेंट समन्वयक प्रा. प्रवीण गोसावी व प्रा. आशीष पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, रजिस्ट्रार डॉ. एम. एम .मुजुमदार यांनी यशस्वितांचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com