आरंभ फाउंडेशनकडून टाकळी येथे वृक्षारोपण

आरंभ फाउंडेशनकडून टाकळी येथे वृक्षारोपण

आरंभ फाउंडेशनकडून
टाकळीत वृक्षारोपण
कोल्हापूर ः येथील आरंभ फाउंडेशनकडून सैनिक टाकळी (ता.शिरोळ) येथे वृक्षारोपण करून छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची जाणीव ठेवून पर्यावरण संवर्धन कार्य, सामाजिक बांधिलकी व सेवावृत्तीने मानवनिर्मित, पुरातन, ऐतिहासिक गावतलावाचे संवर्धन व्हावे व वृक्षसंपदा वाढावी, या दृष्टीने सैनिक टाकळीत वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी संस्थेच्या अध्यक्षा वैष्णवी पाटील यांच्या संकल्पनेतून शिवस्वराज्य वन साकारण्यासाठी वृक्षारोपणास प्रारंभ केला. संजय पाटील, मोहन पाटील यांच्या उपस्थितीत तसेच संस्थेचे नरेंद्र गायकवाड, सुदेश पाटील, उत्तम गायकवाड आदींच्या उपस्थितीत वृक्षारोपण झाले. याकामी ग्रामसेवक, सदस्य, ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com