कोल्हापूर .माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन..

कोल्हापूर .माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन..

Published on

स्पर्धा परीक्षेवर
उद्या मार्गदर्शन
कोल्हापूर : ईझी एज्युकेशन्स, बंडोपंत नाईकवाडे मेमोरियल फौंडेशन, कोल्हापूर युई केअर, एनजीओ कंपेन्शन आणि आमचा गाव आमचा विकास यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. व्याख्यान रविवारी (ता. ७) सकाळी दहाला केशवराव भोसले नाट्यगृहात होणार असल्याची माहिती ईझी एज्युकेशन्सचे प्रमुख किशोर शहा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शहा म्हणाले, ‘‘व्याख्यानासाठी माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी म्हाडा, पुणेचे अशोक पाटील, तसेच बौद्धिक व मानसिक ताणतणावावर नियंत्रण कसे मिळवावे याबद्दल शाल्मली रानमाळे-काकडे मार्गदर्शन करतील. व्याख्यानाचे आयोजन ईझी एज्युकेशन, हजारो अधिकारी घडविलेले नर्मदा व चैताली प्रकाशनचे अमृत काळोखे यांनी केले आहे. सोहळ्यादरम्यान शालेय परीक्षा व स्पर्धा परीक्षेसाठी एज्युकेशनच्या मोबाईल अॅपचे लॉन्चिंग होईल. विनामूल्य व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावेळी मिलिंद घोड, सुलोचना नायकवाडे, प्रभाकर पाटील, संजय काकडे, सुभाष पाटील, शीतल शहा उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.