कंदलगाव .आर.के.नगर मातोश्री वृद्धाश्रम रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य.. ज्येष्ठांची कसरत..

कंदलगाव .आर.के.नगर मातोश्री वृद्धाश्रम रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य.. ज्येष्ठांची कसरत..

Published on

08124
आर. के. नगर मातोश्री वृद्धाश्रम
रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

कंदलगाव, ता. ५ : आर. के. नगरामध्ये केलेल्या खोदाईमुळे मुख्य रस्ता वगळता इतर रस्त्यावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
सोसायटी क्र. ६ मध्ये मातोश्री वृद्धाश्रम आहे. या परिसरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परिसरात नवीन जलवाहिनीसाठी खोदाई करून जलवाहिनी टाकली आहे. मात्र या खोदाईच्या चरी अर्धवट भरल्याने तसेच डांबरीकरण न केल्याने पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांची कसरत होत आहे. संबंधित विभागाने येथे मुरूम टाकून ज्येष्ठांची सोय करावी; अशी मागणी किरण दिनकर पाटील यांनी केली आहे.
चिकट माती अन् निसरट..
येथील छत्रपती शिवाजी उद्यानापासूनच्या परिसरात खोदाई केलेल्या ठिकाणी चिकट माती असल्याने पावसामुळे निसरट झाली आहे. ज्येष्ठांना अनेकदा दुसऱ्याचा आधार घेऊन रस्ता पार करावा लागतो.

चौकट.
पावसाने धोका वाढला..
या रस्त्यावर पाईपलाईन खोदाई केलेल्या चरी अर्धवट भरल्याने त्यामध्ये पाणी साचून चरींची खोली वाढल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे व चिखलाचे साम्राज्य आहे.

कोट.
08123
येथे उद्यान असल्याने सायंकाळी आबालवृद्धांची ये -जा सुरू असते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने धोकादायक स्थिती आहे. येथे खोदलेल्या चरीमुळे कसरत होते.
- विजयराव आडनाईक, ज्येष्ठ नागरिक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.