बुद्धिबळ खेळाचा प्रचार, विकास व्हावा

बुद्धिबळ खेळाचा प्रचार, विकास व्हावा

Published on

8132
कोल्हापूर : बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिरातील मुलांना प्रशस्तिपत्र देताना मान्यवर.
......
बुद्धिबळ खेळाचा प्रचार,
विकास व्हावा ः राठोड

रौनक शहा यांच्या वाढदिनी बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिर उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : ‘बुद्धिबळ या भारतीय खेळाचा प्रचार, प्रसार व विकास व्हावा तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या बौद्धिक क्षमतेचे योग्य नियोजन व्हावे,’ असे मत श्री संभवनाथ जैन श्वेतांबर संघ, गुजरीचे अध्यक्ष नरेंद्र राठोड यांनी व्यक्त केले.
रौनक शहा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. संघाच्या सहकार्य व मार्गदर्शनाखाली नवकार चेस फाउंडेशनमार्फत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मरुधर भवन येथे केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात नवकार मंत्र व पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. युवा उद्योजक रौनक पोपटलाल शहा यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिर आयोजित केले होते. शिबिराचा ७५ जणांनी लाभ घेतला.
रौनक शहा म्हणाले, ‘बुद्धिबळ हा खेळ सर्वांसाठी लाभदायक असून त्यामुळे बुद्धीचा विकास होतो व प्रगती होते. त्यामुळे सर्वांनी बुद्धिबळ शिकावे. सर्व स्पर्धा खेळाव्यात म्हणजे बक्षीसदेखील मिळेल व तुम्हाला खेळाविषयी आवड निर्माण होईल.’
श्री अमिवर्षा शांती महिला मंडळाच्या अध्यक्षा रज्जूबेन कटारिया, नवकार चेस फाउंडेशनचे अध्यक्ष रवी आंबेकर, कोल्हापूर चेस असोसिएशनचे अध्यक्ष भरत चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.
सीमा ओसवाल, विमलजी परमार, पूनम ओसवाल, भरत चौगुले, रणजित पोवार आदी उपस्थित होते. रज्जूबेन कटारिया यांनी स्वागत केले. रवी आंबेकर यांनी प्रास्ताविक केले. भरत चौगुले यांनी आभार मानले.
...
चौकट..
चेस सेटची भेट
नवकार चेस फाउंडेशनचे कार्य असेच पुढे सुरू राहण्यासाठी रौनक शहा यांनी दहा चेस सेट नरेंद्र राठोड व रज्जूबेन कटारिया यांच्यामार्फत रवी आंबेकर यांच्याकडे सुपूर्द केले.
......

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.