कंदलगाव .पाचगाव रोडवरील स्टेट बँक कॉलनीत झाड पडून घराचे नुकसान.. माहिती देऊनही उद्यान विभागाचे दुर्लक्ष..

कंदलगाव .पाचगाव रोडवरील स्टेट बँक कॉलनीत झाड पडून घराचे नुकसान.. माहिती देऊनही उद्यान विभागाचे दुर्लक्ष..

Published on

08134
पाचगाव रोडवरील
झाड पडून घराचे नुकसान

कंदलगाव, ता. ५ : पाचगाव रोडवरील स्टेट बँक कॉलनी, हनुमान नगरात खुल्या जागेत असणारे मोठे झाड दुपारी १ वाजता पडले. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी घराचे नुकसान झाले.
स्टेट बँक कॉलनीतील खुल्या जागेत झाड अनंत माळवी-पाटील व विद्या विनायक शिंदे यांच्या घरावर पडले. दुपारी १ वाजता ही घटना घडली. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी माळवी यांच्या घराच्या खापऱ्या व बॅलन तुटल्याने नुकसान झाले. स्थानिकांनी याबाबत संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना माहिती देऊनही सायंकाळपर्यंत कोणीही फिरकले नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत होता.

कोट.
कोल्हापूर महानगर पालिकेची सुविधा अशी असेल तर राम भरोसे कारभार म्हणावे लागेल.यांची तक्रार अतिरिक्त आयुक्त,उद्यान अधीक्षक,आयुक्त यांचे पर्सनल सेक्रेटरी यांना दिली आहे तरी सुध्दा या ठिकाणी कोणीही फिरकलेले नाही.
- तानाजी जाधव, शहराध्यक्ष, मानवाधिकार सहाय्यता संघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.