कोल्हापूर .धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा.. अन्यथा आंदोलन करू..

कोल्हापूर .धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा.. अन्यथा आंदोलन करू..

‘धनगर आरक्षणाची
अंमलबजावणी करा;
अन्यथा आंदोलन’

कोल्हापूर : सरकार धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीबाबत वेळकाढूपणा करत आहे. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी लेखी स्वरूपात लिहून दिले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली जाईल, परंतु ते न करता टिस संस्था धनगर समाजाच्या माथी मारण्यात आली. याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा प्रा. डॉ. संतोष कोळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कोळेकर म्हणाले, ‘आजपर्यंत आश्वासने देऊन धनगर समाजाचे मतदान घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, आज धनगर समाज जागृत झाला आहे भूलथापांना धनगर बांधव बळी पडणार नाही. त्यामुळे सरकारने धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीबाबत वेळकाढूपणा न करता केंद्राकडे शिफारस करून अंमलबजावणी करावी. सरकारने अंमलबजावणी केल्यास धनगर समाजाने विधानसभेस पूर्णपणे सहकार्य करून गुलाल उधळावा अन्यथा बिरोबाची शपथ घेऊन भंडारा उचलून विरोधात मतदान करून विद्यमान सरकारला खाली खेचेल.’ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमोल गावडे, विजय अनुसे, प्रकाश गोरड, दीपक शेळके, योगिता हुले, शंकर जाधव, संजय पटकरे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com