कोल्हापूर.शिवाजी विद्यापीठ कुलसचिव निवड नियमबाह्य.

कोल्हापूर.शिवाजी विद्यापीठ कुलसचिव निवड नियमबाह्य.
Published on

कुलसचिव निवड प्रक्रिया रद्द न
केल्यास आंदोलन : संजीव सलगर

कोल्हापूर, ता. ३० : शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. एन. शिंदे यांच्या निवडीमध्ये अनियमित्ता झाल्यामुळे व इतर पात्र उमेदवारांवर अन्याय झाल्याने या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी होऊन कुलसचिव निवड प्रक्रिया रद्द करावी. याबाबत त्वरित निलंबनाची कारवाई करावी; अन्यथा १४ ऑक्टोबरला तीव्र आंदोलन करू, असा इशारा पतित पावन संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजीव सलगर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सलगर म्हणाले, ‘शिवाजी विद्यापीठ प्रशासनास या निवडीबाबत २२ ऑगस्ट व २५ सप्टेंबरला सूचनांच्या निवेदनासह पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेतलेली नाही. आठवड्यात याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास विद्यापीठासमोर तीव्र आंदोलन करू. यावेळी उद्‌भवणाऱ्या सर्व परिस्थितीस विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील.’
जिल्हा सचिव काकाजी मोहिते, जिल्हा संघटक मधुकर मांडवकर, शहराध्यक्ष अतुल कोईंगडे, शहर उपाध्यक्ष विनोद बामनकर, शहर संघटक विठ्ठल आडुळकर, राजेंद्र पाटील, मेघशाम जगताप उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com