कंदलगाव.वनविभागाकडून चित्ररथाद्वारे वन्यजीव सप्ताह साजरा.

कंदलगाव.वनविभागाकडून चित्ररथाद्वारे वन्यजीव सप्ताह साजरा.

Published on

08851
वन विभागाकडून चित्ररथाद्वारे
वन्यजीव सप्ताह साजरा
कंदलगाव, ता. २ : भारतात १९५२ पासून वन्यजीव सप्ताह साजरा होत आहे. या उपक्रमांतर्गत वन्यजीवांनी मानवी आयुष्यात प्रवेश करण्यामागची कारणे समजावून दिली जात आहेत. १ ते ७ ऑक्टोंबर दरम्यान सप्ताह साजरा होतो. करवीर वन विभागाकडून चित्ररथाद्वारे जनजागृती सुरू असून रथाचे सीबीएस स्टॅन्डवर स्वागत झाले. दरम्यान यावेळी २ ऑक्टोबरनिमित्त स्वच्छता मोहीमही राबविली.
विभाग नियंत्रक शिवराज जाधव, विभागीय वन अधिकारी रमेश कांबळे, एनआयटी प्रा. संजय दाभोळे, आगार व्यवस्थापक अनिल म्हेत्तर, कार्यशाळा प्रमुख विजय निगडे, संकेत जोशी, मल्लेश विभूते, युथ फाऊंडेशनचे राहुल चौधरी, उपनगर कृती समितीचे चंद्रकांत कांडेकरी, फिरोज शेख, शीतल नलवडे, विजय देसाई यांच्यासह दोन्ही विभागांतील कर्मचारी उपस्थित होते.

कोट.
पर्यावरणाची हानी होत असल्याने वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे. त्यामुळे निसर्गचक्र, निसर्गसौंदर्य आणि वैविध्यता कायम राखण्याकरिता वन्यजीव सप्ताहानिमित्त का होईना मानवाने त्यांच्या संरक्षणाकरिता हातभार लावण्याची गरज आहे.
- रमेश कांबळे, विभागीय वनाधिकारी, करवीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com